कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू!

मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. छोटा राजनला तिहार तुरुंगात असताना कोरोनाची लागण झाली होती.
तिहार तुरुंग आणि दिल्ली पोलिसांकडून अद्याप अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूसंबंधित अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एम्सनेही अधिकृत स्वरुपात या बातमीची पृष्टी केलेली नाही.
छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं.
छोटा राजन याच्यावर अपहरण आणि हत्येच्या अनेक प्रकरणांसह 70 हून अधिक केसेस दाखल होते. त्याला मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे हिच्या हत्येत दोषी करार देत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र 2015 साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली होती.