गारगोटी येथे उद्या क्रांती युथ अँड हेल्थ फाऊंडेशन मार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन.

गारगोटी :
गारगोटी येथे उद्या (दि. ०७) रोजी क्रांती युथ अँड हेल्थ फाऊंडेशन मार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन शाहु वाचनालय, गारगोटी येथे सकाळी ०९.०० ते ०३.०० या वेळेत करण्यात आले आहे. सध्या देशामध्ये जाणवत असलेला रक्त तुटवडा लक्षात घेवून उर्जा क्रिएशन संचलित क्रांती युथ अँड हेल्थ फाऊंडेशन मार्फत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गारगोटी सह परिसरातील दात्यांनी रक्तदान करण्यासाठी यावे, असे आवाहन स्वप्निल अशोकराव साळोखे व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
जिंकायचे आहे भारताला.
हरवायचे आहे कोरोना ला.
तर चला मग सामील होवुया या आणि रक्तदान करूया.
प्रत्येक रक्तदाता याला माणुसकीची भेट.
दिनांक:- 7/5/2021
स्थळ:- शाहु वाचनालय गारगोटी.
सकाळी :- 9 ते 3 या वेळेत.
आयोजक :-
उर्जा क्रिएशन संचलित
क्रांती युथ अँड हेल्थ फाऊंडेशन.
स्वप्निल अशोकराव साळोखे.
9049900947
आपुलकी केअर फाउंडेशन
संदीप कांबळे.
9404291860