अवकाळी पावसामुळे करवीर तालुक्यात कोथिंबीरी पिकाचे नुकसान

सावरवाडी प्रतिनिधी :
गेल्या चार दिवसापासून जोरदार स्वरूपात पडलेल्या अवकाळी पावसामुळे करवीर तालुक्यात कोथिंबीरी पीकाचे नुकसान होऊ लागले . पावसाबरोबर वादळी वाऱ्यामुळे कोथिबीरी पीक शेतीमध्ये कोलमडून पडू लागले.
एप्रिल महिन्यातील कडक उन्हाळा ऋतु मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली . एकीकडे बाजारपेठेत कोथिंबीरी पीकाला चांगला दर मिळत असुन दुसरीकडे नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
अवकाळी पावसाबरोबर वादळी वाऱ्यामुळे कोथिबीरी पीकाचे शेतीमध्ये नुकसान होऊ लागले आहे . ऐन काढणीस आलेल्या कोथिंबीरी पीकांची काढणीची धांदल ग्रामीण भागात सुरू आहे . शेतीतील नाशिवंत मालाची काढणी करून बाजारपेठेत विकला जात आहे
लॉकडाऊन आणि नैसर्गिक अपत्ती या समस्यामुळे कोथिंबीरी पीकाच्या काढण्या जोरदार स्वरूपात करवीर तालुक्यात सुरू झाल्या आहेत कोथिंबीरी पिकांचे मळे रिकामे करण्यात बळीराजा मग्न आहे.