ताज्या बातम्या

चांदे – मांजरवाडी रस्ताची दुरावस्था

धामोड प्रतिनिधी ( प्रतिश पाटील )

      

 चांदे ते मांजरवाडी या दोन गावांना जोडणारा रस्ता अत्यंत बिकट अवस्थेत आहे . राधानगरी व करविर या दोन तालुक्याच्या हद्दीला जोडणारा हा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत आहे . मोटरसायकल व चार चाकी वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे .

        मांजरवाडी फाटा, चांदे ते राशीवडे फाटा यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे . पण याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत . या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही .

    त्यामूळे या रस्त्याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून हा रस्ता करावा अशी मागणी स्थानिक नागरीकातून होत आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks