कठिण परिस्थितीत राज्य सरकारने बांधकाम कामगारांना मदत केली – लाल बावटा

प्रतिनिधी :
लॉकडाऊन सारख्या परीस्थितीत बांधकाम कामगारांच्या खात्यावर १५०० रूपये तात्काळ जमा करून बांधकाम कामगारांना कठिण परीस्थितीत अर्थसहाय्य करून कामगारांना दिलासा दिल्याची भावना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ भरमा कांबळे व जिल्हा सचिव कॉ शिवाजी मगदूम यांनी व्यक्त केली.
दि १२ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सिटुचे पदाधिकारी व मान. नाम. हसन मुश्रीफ,यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी मान. दौलत देसाई, सहाय्यक कामगार आयुक्त मान. संदेश आयरे, सरकारी कामगार अधिकारी मान. यशवंत हुंबे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठक ही लॉकडाऊनमध्ये कामगारांना येणाऱ्या अडचणी जाणुन घेण्यासाठी नाम. मुश्रीफ यांनी आयोजित केली होती.
या चर्चेमध्ये मान. नाम. हसन मुश्रीफ यांनी कामगारांच्या अडचणी जाणून घेऊन कामगारांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले सिटुचे पदाधिकाऱ्यांना दिले होते.
या बैठकीस सिटुचे कॉ भरमा कांबळे, कॉ चंद्रकांत यादव, कॉ शिवाजी मगदूम उपस्थित होते,
या बैठकीच्या अनुषंगाने लगेच दुसऱ्या दिवशी १३ एप्रिल रोजी मान. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी बांधकाम कामगारांसह अन्य कामगारांना १५०० रूपये अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली होती.
त्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील बहुतांशी कामगारांच्या खात्यावर महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांच्या खात्यावर १५०० रूपये जमा करण्यास सुरवात केली आहे.हि रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा होताच कामगारांच्यामधुन समाधान व्यक्त केले जात असल्याचे लाल बावटा संघटनेने प्रसिद्धस दिले आहे.