मुरगूड बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते २३ मे रोजी सभासदांना भेटवस्तू प्रदान समारंभ

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवार दि. २३ मे रोजी सकाळी दहा वाजता मुरगूड येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू प्रदान समारंभ आयोजित केला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ राहणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली .
या कार्यक्रमासाठी बिद्री साखरचे चेअरमन के पी पाटील, माजी आम. संजयबाबा घाटगे हे प्रमुख पाहुणे तर कोल्हापूर जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे , गोकूळचे चेअरमन अरुण डोंगळे , जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे , संताजी साखरचे चेअरमन नविद मुश्रीफ, शेतकरी संघ चेअरमन बाबासाहेब शिंदे , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर , गोकूळ संचालक युवराज पाटील , केडीसी संचालक भैय्या माने , बिद्री साखरचे व्हॉ. चेअरमन मनोज फराकटे , शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील , रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी चेअरमन प्रवीणसिंह पाटील यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना बँकेने १०० कोटींचा ठेवींचा टप्पा पार केला आहे . तर निव्वळ नफा १ कोटी ७ लाख झाला असून बँकेने सभासदांना ११ % लाभांश दिला आहे . बँकेने गेली ७५ वर्षे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या राहणीमान सुधारण्यात मोलाचे योगदान मोठे आहे. दिवंगत विश्वनाथराव पाटील यांनी घालून दिलेल्या चौकटीत राहून संचालक मंडळ काम करीत असल्याचे सांगितले. यावेळी व्हॉईस चेअरमन वसंतराव शिंदे , संचालक साताप्पा पाटील,ॲड.सुधीर सावर्डेकर , गणपतराव लोकरे,विठ्ठल भारमल, मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वास चौगले उपस्थित होते.
अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम महिला साठी होम मिनिस्टर व्याख्यानमाला, संचालक व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे