ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र
निधनवार्ता – महादेव हरी खराडे

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथील महादेवराव हरी खराडे ( वय ९८ ) यांचे निधन झाले. २५ वर्ष ते शिंदेवाडी गावचे सरपंच होते. मुरगूड परिसरातील सर्वात मोठ्या महादेव दुध संस्थेचे ते संस्थापक होते. उत्तम प्रशासक व माजी खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचे निष्ठावंत कार्यकर्ते कागल तालुक्याच्या राजकारणात त्यांची ओळख होती. अनेक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. मुरगूड नगरपरिषदेरच्या माजी नगरसेविका सौ .शोभा बाजीराव खराडे यांचे ते सासरे होत .त्यांच्या पश्चात तीन मुले , दोन मुली , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे . रक्षा विसर्जन बुधवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शिंदेवाडी येथे आहे .