ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गणेश नागरी पतसंस्थेच्या सभापतीपदी सुखदेव येरुडकर तर उपसभापतीपदी मारुती पाटील यांची निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील श्री. गणेश नागरी सहकारी पत संस्थेच्या सभापतीपदी सुखदेव येरुडकर यांची तर उपसभापतीपदी मारुती पाटील यांची निवड झाली.ही निवड २०२३-२०२४ या वर्षासाठी असून
सहकारी संस्था, कागलचे सहाय्यक निंबधक समीर जांभोरकर यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारी संस्था, कागलचे अमर शिंदे यांच्या उपस्थितीत झाली .
यावेळी संचालन उदयकुमार शहा ,एकनाथ पोतदार ,आनंद देवळे ,प्रकाश हावळ , सोमनाथ यरनाळकर , राजाराम कुडवे, दत्तात्रय कांबळे,आनंद जालिमसर,सौ .रुपाली शहा , सौ . रेखा भोसले , कार्यकारी संचालक राहुल शिंदे उपस्थित होते .