ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘शाहू’च्या सहवीज निर्मिती प्रकल्पास देशपातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट’ पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी प्रदान ; पुणे येथे शानदार सोहळ्यात पुरस्कार वितरण

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने सह-विज निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रकल्पास सन २०२४ करिता देण्यात येणारा सर्वोच्च मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा देशपातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट’ हा पुरस्कार येथील श्री छत्रपती शाहू कारखान्यास सलग तिसऱ्या वर्षी प्रदान केला.

पुणे येथे झालेल्या शानदार सोहळ्यात माजी केंदीय संरक्षणमंत्री व को जनरेशन असोसिएशन आॕफ इंडीयाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार,महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व नॅशनल फेडरेशन आॕफ को-आॕपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.यावेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील,को जनरेशन असोसिएशन आॕफ इंडीयाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर तसेच को जनरेशन असोसिएशन आॕफ इंडीयाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कारखान्याच्या वतीने संचालक शिवाजीराव पाटील व सतीश पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.कारखान्यास मिळालेला हा ७२वा पुरस्कार आहे. कारखान्यास मिळालेल्या या पुरस्कारामुळे सभासद शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks