ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड नगरपालिकेतर्फे शनिवारी (८ मार्च ) मॅरेथॉन स्पर्धा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ व ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत ८ मार्च रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती मुख्याधिकारी अतीश वाळुंज यांनी दिली. सकाळी ६ वाजता मॅरेथॉन स्पर्धा हुतात्मा तुकाराम चौकातून सुरू होणार आहे. स्पर्धेचा मार्ग कापशी रोड, पोलीस ठाणे, महात्मा गांधी मार्ग, जवाहर रोड, गावतलाव, शिवाजी रोड असा असणार आहे. स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी अतीश वाळुंज यांनी केले आहे.