ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड मधील निघालेली बाईक रॅली म्हणजे समरजितदादा यांची विजयाचीच खात्री : सुदर्शन पाटसकर ; भाजप युवा मोर्चाच्या वतीने शहरातुन बाईक रॅली

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

 पंतप्रधान मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील भाजप युवा मोर्चा च्या वतीने शहरातुन बाईक रॅली काढली.यावेळी प्रदेश भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सरचिटणीस व महामंत्री सुदर्शन पाटसकर म्हणाले , पंतप्रधान मोदींनी देशाचा चेहरा मोहरा बदलला आहे. भाजप सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात पोचवावी . तसेच २०२४ ला पंतप्रधान मोदींचे सरकार व विधानसभेला समरजितसिह घाटगे यांना विजयी करण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले .

यावेळी विशाल पाटील ,अमोल शिवाई प्रियाताई पोवार  आदींची मनोगते  झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुपजी मोरे , विश्वजीतसिंह पाटील , पृथ्वीराज  , पाटील कागल तालुका भाजपा अध्यक्ष संजय पाटील, बिद्रीचे संचालक दत्तामामा खराडे, अनंतराव फर्नांडिस  ,धोंडीराम माडेकर ,शिवाजी इंदलकर, विलास गुरव ,संजय चौगुले ,  विजय राजिगरे , राजू चव्हाण , सुशांत मागोरे , सदाशिव गोधडे, नाना डवरी, सुनील कांबळे ,विनोद निकम ,राहुल खराडे यांच्यासह युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक दगडू शेणवी यांनी केले .सुत्रसंचलन संग्राम साळोखे यांनी केले . तर आभार प्रवीण चौगले यांनी मानले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks