मुरगुड विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

निकाल न्यूज मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र अंनिस,समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगूड प्रशालेच्या प्रहारी क्लब यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या तब्बल 1700 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड येथील पाचवी ते दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांनी आज शुक्रवारी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य एस पी पाटील यांनी केले.फटाके मुक्त दिवाळीची शपथ मराठीचे ज्येष्ठ अध्यापक एम बी टिपूगडे यांनी दिली. यावेळी उप मुख्याध्यापक एस.बी.सूर्यवंशी उपप्राचार्य एम.डी. खांटांगळे,पर्यवेक्षक एस.डी.साठे, कार्यालय प्रमुख एम.एस.कांबळे शिक्षक प्रतिनिधी एस.जे.कटके ए. एस. मांगोरे तंत्र विभाग प्रमुख पी.बी.लोकरे, एस.एस. चंदनशिवे, एस.डी.कुंभार ,एन एन गुरव,एस एस कळंत्रे, बी वाय मुसाई , वाय ई देशमुख, शिक्षकेतर कर्मचारी महादेव कांबळे,ए एस सावंत,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.