कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, कडगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न.

कडगाव प्रतिनिधी :
वंचित आणि शोषित समाजाच्या दुःखांना वाचा फोडण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले, असे मनोगत ज्येष्ठ शिक्षक ए. डी. देसाई यांनी केले. कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात ते बोलत होते .
कडगाव येथील कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की अण्णाभाऊ साठेनी मराठी साहित्यामध्ये केलेले कार्य सुवर्णाक्षराने नोंद करण्यासारखे आहे. लेखणीच्या सामर्थ्याने दिन दलित गरीब लोकांच्या वेदना जाणून घेऊन समाजासमोर मांडण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले.
प्रारंभी प्रतिमापूजन मुख्याध्यापक डॉ. आर .डी.पोवार यांनी केले. स्वागत आणि प्रास्ताविक सी. एस. मासाळ यांनी केले यावेळी अकबर भडगावकर, चंद्रकांत लिमकर, भैरवनाथ राणे, सत्यजित चोरगे, प्रशांत भोसले, वजीर मकानदार शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आभार दिलीप पाटील यांनी मानले.