असंघटीत कामगारांचे जिवनमान उंचावणार : कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास ; झुलपेवाडीत सव्वा सहा कोटींच्या विकासाकामांचा शुभारंभ व लोकार्पण

उत्तूर प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जवळपास 11 कोटी असून त्यापैकी साडेपाच कोटी हे कामगार आहेत. यातील फक्त 80 लाख कामगार हे नोंदीत म्हणजेत संघटीत आहेत. उर्वरीत चार कोटींहून अधिक कामगार असंघटीत आहेत. संघटीत कामगारांच्या बरोबरच असंघटीत कामगारांचे जिवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
झुलपेवाडी ता. आजरा येथील सुमारे सव्वा सहा कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा व बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटीचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य वसंतराव धूरे होते. यावेळी पिंपळगाव – झुलपेवाडी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण, रिंगरोड खडीकरण व डांबरीकरण, गावाअंतर्गत खडीकरण व डांबरीकरण, पाणवठा रस्ता खडीकरण व डांबरीकरण, गावातील सर्व बोळांमध्ये पेव्हिंग ब्लाँक बसविणे आदी कामाचा लोकार्पण तसेच नळ पाणी पुरवठा योजना बसविणे, राज्यमार्ग 189 ते झुलपेवाडी मुख्य रस्ता करणे, झुलपेवाडी ते चिमणे रस्ता सुधारणा करणे, साकव बांधकाम करणे आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कामगार विभागाच्या माध्यमातून अनेक योजनांच्या माध्यमातून लाखो कामगारांना लाभ मिळत आहे. कामगारांच्या नोंदनीची प्रक्रिया सुलभ केली असून त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. यामाध्यमातून जास्तीत जास्त कामगारांनी नोंदनी आपले व आपल्या कुटंबाचे आयुष्य तसेच मुलांच भविष्य सुरक्षित करावे.
सुरवातीला कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झालेबद्दल रणजितसिंह कृष्णराव पाटील, सुधीर देसाई यांचा तर गोकूळच्या संचालकपदी निवड झालेबद्दल श्री. अंजनाताई रेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच नामदेव जाधव, विष्णू जाधव, तुकाराम बळवेकर, सदाशिव लाड, हनमंत तोडकर, राजाराम बेळवेकर, पी. डी. माने, माने गुरुजी, आनंदा जाधव, संभाजी जाधव, विश्वास जाधव, अमर जाधव, सुमन धामणकर, अशोक सुतार, नंदू बाळू आरेकर, आर. बी. व्हेल्हाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.