ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक
कडगाव हायस्कूल, कडगाव व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण

कडगाव :
कडगाव हायस्कूल, कडगाव व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
मारुती दत्तात्रय देसाई, ज्येष्ठ नागरिक कडगाव यांच्या हस्ते आंबा आणि नारळाच्या रोपांचे रोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख माननीय चंद्रकांत मासाळ, व राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते चंद्रकांत मासाळ यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व आणि गरज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. आर.डी पोवार. ए.डी देसाई, ए एम भडगावकर, सत्यजित चोरगे, बी. ए. डावरे, वजीर मकानदार , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार डी. जी .पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एम. भडगावकर यांनी केले.