ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता सावर्डे पा!! येथील जोतिबा यात्रा रद्द : कोरोना दक्षता कमिटी चा निर्णय

राधानगरी प्रतिनिधी:
प्रति जोतिबा असे ओळखले जाणारे सावर्डे पा !! (ता.राधानगरी) येथील जोतिबा यात्रा रद्द करण्याचा निर्णय सावर्डे पा!! ग्रामपंचायत व को२ोना दक्षता समिती ने घेतला आहे .
सावर्डे, पा !! येथे दरवर्षी जोतिबा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते . यात्रेला राधानगरी पंचक्रोशी सह परगावचे पै-पाहुणे हि मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे येथे गर्दी हि होत असते .यावर्षी मात्र कोरोना चे वाढते प्रमाण लक्षात घेता ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामपंचायत ने निकाल न्यूजशी बोलताना सांगितले. तसेच याबाबत गावच्या नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हे त्यांनी केले .