ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटांसह हलक्या पावसाची शक्यता

पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. यामध्ये आजसह उद्या शनिवारी (दि.१०) आणि रविवारी (दि.११) रोजी विदर्भ आणि मराठावाड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाने दिले आहे.

पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती त्यांच्या X अकाऊंटवरून दिली आहे. उद्या शनिवारी कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोबत वादळी वारे 30-40 किमी प्रति तास वेगाने वाहणार असल्याचेदेखील डॉ. होसाळीकर यांनी म्हटले आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली आणि परभणी येथे वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बं. उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊससदृश्य परिस्थिती…
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यातील काही भागांत शुक्रवारी आणि शनिवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यातील किमान व कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्या भागात पश्चिमी चक्रवाताचा जोर कायम आहे. मात्र, महाराष्ट्रात तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे.

असा आहे पावसाचा अंदाज…
मध्य महाराष्ट्र : 10 व 11 फेब्रुवारी
मराठवाडा : 10 व 11 फेब्रुवारी
विदर्भ : 10 ते 14 फेब्रुवारी

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks