ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल तालुक्यातील उंदरवाडी येथे दिवसाढवळ्या चोरी ; 10 तोळे सोने व 25 हजार रुपये चोरट्याने केले लंपास

उंदरवाडी (ता.कागल) येथील प्राथमिक शिक्षक विजय रामचंद्र पाटील यांच्या घरी आज दुपारी सव्वा एकच्या दरम्याने चोरट्याने प्रवेश करून तिजोरीत असणारे दहा तोळे सोने व 25 हजार रुपये लंपास केले. दिवसा ढवळ्या दुपारी घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, विजय पाटील यांच्या पत्नी मेघा या दुपारी एकच्या दरम्याने घरगुती कामानिमित्त आपल्या मुलीला घेऊन जवळच गेले होत्या. दुपारी जाताना त्या दाराला कडी लावून गेल्या होत्या. आपले काम आटोपल्या नंतर अर्ध्या तासातच त्या घरी आल्या. खोलीत गेल्यानंतर त्यांनी तिजोरी उघडली असता त्यांना तिजोरीतील साहित्य विस्कटलेले दिसले. सोने आणि पैसे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना चोरीचा संशय आल्याने मेघा पाटील यांनी आपले पती विजय यांना याबाबतची माहिती फोनवरून सांगितली. गंठण, नेकलेस, मंगळसूत्र असे दहा तोळे सोने चोरीस गेले.

विजय पाटील हे पंढरपूरला पायी दिंडीतून पंढरपूरला जात होते. मिरजेतूनच ते परत आले. विजय पाटील यांचे घर गल्लीतच रहदारीच्या ठिकाणी असून चोरी झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी गर्दी केली.

याबाबतची फिर्याद मेघा पाटील यांनी मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. अधिक तपास मुरगुड पोलीस करीत आहेत.

‘मुरगूड पोलिसांनी श्वानाला पाचारण केल्यानंतर श्वान शेजारच्या दोन गल्लीतूनच फिरून तेथेच थांबले. चोरटा माहितीतील असावा व त्याने पाळत ठेवून चोरी केली असावी याची चर्चा ग्रामस्थांमधून व्यक्त होत होती.’

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks