ताज्या बातम्या

विनाकारण फिरणाऱ्यांवर आजरा प्रशासनाकडून कारवाई

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार

विनाकारण,विनामास्क फिरणाऱ्यांवर आजरा स्थानिक प्रशासनाकडून कडक कारवाई करणेत येत आहे शहरात रुग्णवाहिका उभी असून शहरात विनाकारण प्रवेश केलेस सदर रुग्ण वाहिकेत घालून कोरोना टेस्ट करणेत येत आहे तरी सर्वांनी शहरात विनाकारण प्रवेश करू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे तहसीलदार विकास अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व नगरपंचायत कडून नियमांची कडक अमलबजावणी होत आहे पोलीस प्रशास्नाकडून काही व्यापारी दुकाने 11 नंतर सुरु ठेवत होते मात्र त्यांना दुकाने बंद करणेस भाग पाडले तहसीलदार विकास अहिर,मुख्याधिकारी अजिंक्य पाटील,सपोनी बालाजी भांगे यांचेसह प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी रस्त्यावर उतरून कारवाई करीत होते कर निरीक्षक विजयकुमार मुळीक ,सहायक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून शहरात दिवसभर गस्त सुरु ठेवली होती या कारवाईमुळे शहरात शुकशुकाट पसरला होता

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks