शिवसेना संपर्क कार्यालयाचे पावित्र्य जपा: संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांचे आवाहन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे पावित्र्य शिकवले आहे ते शिवसेना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जपावे असे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांनी केले. ते हमिदवाडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
शिवसेना तालुकाप्रमुख जयसिंग टिकले यांनी हमीदवाडा येथे शिवसेना संपर्क कार्यालय सुरू केले असून त्याचे उद्घाटन अरुण दुधवाडकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अरुण दुधवाडकर यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या हिताची गटातटाच्या पलीकडे जाऊन समाज हिताची कामे व्हावीत अशी भावना व्यक्त केली.
शिवसेना उपनेते संजय पवार यांनी संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी गाव तेथे शिवसेनेची शाखा सुरू करण्यासाठी सर्वांनी मेहनत घेण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली. नूतन कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले यांनी या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना व प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील व हे संपर्क कार्यालय 24 तास सर्वसामान्य जनतेसाठी खुले असेल असे सांगितले.
यावेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार संजय बाबा घाटगे, उपजिल्हा संघटक संभाजी पाटील, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे ,उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील ,इचलकरंजी संपर्कप्रमुख ,राधानगरी संपर्कप्रमुख सुरेश चौगुले, कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले, कर्नाटक राज्य मानवाधिकार संघटना अध्यक्ष उत्तम कामते ,युवा सेना उपजिल्हाप्रमुख समीर देसाई, मुरमुड युवासेना शहराध्यक्ष विजय भोई,उपतालुकाप्रमुख अण्णासाहेब तिप्पे, विभाग प्रमुख युवराज येजरे ,शाखाप्रमुख बाळासाहेब उपाशे,उपसरपंच उमेश डावरे, माजी सरपंच विलास जाधव, महेश जाधव, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.