कोल्हापूर जिल्हासाठी दररोज कोरोना लसीचे पन्नास हजार डोस द्या – आ.चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

कोल्हापुर :रोहन भिऊंगडे
कोल्हापूर शहर व जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे दररोज पन्नास हजार डोस द्यावेत अशी मागणी कोल्हापूर शहर उत्तर चे आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना चा संसर्ग जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. तरीपण कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याचे दिसून येत आहे. आणि दुसरीकडे कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. कोल्हापूर शहरात दररोज पाच हजार तर जिल्ह्यात दररोज पनचेच्याळीस हजार कोरोना लस ची मागणी असताना केवळ 20 ते 30 हजार कोरोना लसी चे डोस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी पहावयास मिळत आहे. तसेच दररोज 20 ते 25 हजार लोकांना लस न घेता घरी परतावे लागत आहे. या वाढत्या कोरोना संसर्ग रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. म्हणून शहरासाठी 5 हजार तर जिल्ह्यासाठी 45 हजार असे 50 हजार लसीचे डोस दररोज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.