आजरा : हंदेवाडी येथे मंगलअक्षता कलश दर्शन व मिरवणूक सोहळा उत्साहात

हंदेवाडी/पुंडलीक सुतार
हंदेवाडी ता.आजरा येथे श्री राम जन्मभूमि प्राण प्रतिष्ठा सोहळा व मंदिर उद्घाटन च्या अनुषंगाने श्री मंगलअक्षता कलश दर्शन स्वागत व मिरवणूक काढण्यात आली. अक्षता कलश आजरा येथून गावात आणून सर्व ग्रामस्थांनी भजना च्या गजरात गावातून मिरवणुकिला सुरुवात करण्यात आली.
संपूर्ण गावभर कलशाची मिरवणूक काढून पुन्हा श्री ब्रम्हदेव मंदिरात कलश पूजन करून स्थापन करण्यात आला.घरोघरी अक्षता चे वाटप करून दिनांक 22 जानेवारी ला विधिवत पूजा करून अक्षता राम मूर्ती ला वाहिल्या जातील,तसेच त्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने गोड प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी भजनी मंडळे,तसेच तरुण मंडळे त्याच सोबत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे प्रत्येक घरातील महिलांनी डोकीवर कलश घेवून मिरवणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला. संपूर्ण गावात पळक करून सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
गावामध्ये सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमातील एकी नेहमीच दिसून येते.संपूर्ण उत्साहात या कार्यक्रमाची सांगता झाली .