हुन्नर गुरुकुल प्रकल्पास प्रसिद्ध उद्योजक देवानंद लोंढे यांची भेट

उत्तूर प्रतिनिधी :
शनिवार दि. 17 हुन्नर गुरुकुल प्रकल्पास सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव सारख्या एका खेडे गावातून जगाच्या नकाशावर ठसा उमटवणारे सामाजिक बांधिलकी जपत आसपासच्या हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारे प्रसिद्ध उद्योजक श्री. देवानंद लोंढे सर यांनी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. हुन्नर गुरुकुल मधील कारपेंटरी व बांधकाम विभागातील विद्यार्थ्यांनी केलेले काम पाहिले व मुलांचे कौतुक केले. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील उद्योजक बनले पाहिजेत हेच व्रत श्री. लोंढे सर मनोमन ठेवून युवकांना मार्गदर्शन करत असतात. आजही त्यांनी गुरुकुल च्या विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोशल्य शिक्षण ही आज काळाची गरज आहे व या शिक्षणाच्या जोरावर प्रत्येक जण उभारी घेऊ शकतो. यासाठी जिद्द, चिकाटी व प्रामाणिक मेहनत करणे गरजेचे आहे.
हुन्नर गुरुकुल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागातील गरजवंत मुलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे असे मत श्री. देवानंद लोंढे यांनी व्यक्त केले.
यावेळी हुन्नर गुरुकुल मधील निदेशक श्री. गणेश सुतार, सुनील सुतार व हुन्नर गुरुकुलचे विद्यार्थी उपस्थित होते.