ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृत्तपत्र विक्रेत्यांना १५००रुपयांची आर्थिक मदत करावी : काशिनाथ गडकरी

गडहिंग्लज : सोहेल मकानदार

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने लॉकडाऊन सह कडक संचारबंदी करण्यात आलेली आहे . तर अनेकांचे रोजगारधंदे थांबल्याने मोठी अडचण निर्माण झालेली आहे . त्यामुळे शासनाने काही मदत म्हणून काही आर्थिक घटकांना रू . १५०० / – ची आर्थिक मदतही जाहिर केलेली आहे त्यामुळे काही प्रमाणात मिळालेला आहे . पण राज्यातील वृत्तपत्रे विक्रेते हे कोरोनाच्या काळातही घरोघरी दैनिक वृत्तपत्रे पोहचवत आहेत . तसेच ऊन – वारा – पाऊस याची तमा न बाळगता बारा महिने हे काम करून राज्यातील घडामोडी नागरीकांच्या घरोघरी पोहचवत आहेत . तर कारोनाच्या काळामध्ये त्यांना देखील रू . १५०० / – ची आर्थिक मदत दिलेस त्यांचे कुटुंबाला देखील हातभार लागेल. , राज्यातील दैनिक वृत्तपत्रे विक्रेत्यांना रू . १५०० / – ची आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी गडहिंग्लज शिवसेना उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks