प्रविणसिंह पाटील यांना गोकुळ ला उमेदवारी द्यावी मुरगुड पंचक्रोशीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मागणी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड चे माजी नगराध्यक्ष,बिद्री सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक व गोकुळ बचाव कृती समितीचे आक्रमक नेतृत्व प्रविणसिंह विश्वनाथराव पाटील यांना राष्ट्रवादीने कागल तालुक्यातुन उमेदवारी द्यावी अशी मागणी मुरगुड शहर व पंचक्रोशीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
प्रविणसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी मुरगुड व पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी शनिवार दि.१७ रोजी मुरगुड येथे बैठक घेतली यावेळी वसंतराव शिंदे यांनी प्रविणसिंह पाटील यांचा संपर्क संपुर्ण जिल्हा भर आहे.गोकुळ निवडणूक लढवायची यासाठी ठराव नावावर घेतल्यापासून ते आजपर्यंत सातत्याने ठराव धारकांच्या संपर्कात आहेत.नामदार हसन मुश्रीफ यांनी कामाला लागा असा आदेश दिल्यानेच ठराव धारकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.यामुळे ठराव धारकाचा एकमुखी पाठिंबा मिळत आहे असे सांगितले.
गोकुळ बचाव कृती समिती मध्ये प्रारंभापासून त्यांची भुमिका महत्त्वाची,व संघर्षाची आहे.नामदार मुश्रीफ यांच्या विजयासाठी त्यांनी जिवाचे रान केले आहे.प्रामाणिक,निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे.अशा जनतेच्या उपयोगी असणार्या या कार्यकर्त्या ला गोकुळ मध्ये संधी देऊन पश्र्चिम कागल समजल्या जाणाऱ्या मुरगुड परीसरात राष्ट्रवादी पक्ष मजबुतीसाठी साथ द्यावी अशी मागणी राजु आमते व सुधिर सावर्डेकर यांनी केली.
यावेळी संजय मोरबाळे, शिवाजी सातवेकर,अर्जुन मसवेकर, जगन्नाथ पुजारी,नामदेव भांदीगरे यांनी मनोगते व्यक्त केली.प्रसंगी नगरसेवक राहुल वंडकर, प्रल्हाद कांबळे,मनाजी सासने, सुधिर मोहीते, रणजित मगदुम, एकनाथ पाटील,अमर देवळे,राजु चव्हाण,दिग्वीजय चव्हाण आदि उपस्थित होते.आभार गुरुदेव सुर्यवंशी यांनी मानले.