गडहिंग्लज : साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने 18 ते 24 डिसेंबर अखेर लोकशिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) रुपेश मऱ्यापगोळ
गडहिंग्लज नगर परिषदेच्या साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने येत्या 18 ते 24 डिसेंबर अखेर रोज संध्याकाळी सहा वाजता लोकशिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर ही व्याख्यान माला असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी केली आहे.
या व्याख्यानमालेत दिनांक 18 डिसेंबर रोजी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे शिवराज्याभिषेकाची 350 वर्षे या विषयावर व्याख्यान होणार आहे. 19 डिसेंबर रोजी प्राध्यापक अजित कुमार कोष्टी यांचे हसवणूक हा एकपात्री प्रयोग होणार आहे. 20 डिसेंबर रोजी डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम होणार आहे. 21 डिसेंबर रोजी लोकशाहीर रणजीत आबा अंबाजी यांचे महामानव समजून घेताना हा शाहिरी जलसा कार्यक्रम होत आहे.
22 डिसेंबर रोजी पत्रकार श्रीराम पवार यांचे भारताचे राजकीय वाटचाल या विषयावर व्याख्यान होणार आहे. 23 डिसेंबर रोजी मुक्ता चैतन्य यांचे डिजिटल ड्रगच्या विळख्यातील समाज या विषयावर व्याख्यान होणार आहे. 24 डिसेंबर रोजी पुरस्कार वितर होणार असून या दिवशी सलीम मुल्ला यांचे निसर्ग आणि मी या विषयावर व्याख्यानाने व्याख्यानमालाची सांगता होणार आहे.