ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सर पिराजीराव गूळ उत्पादकची सभा खेळीमेळीत

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता कागल येथील सर पिराजीराव सहकारी गूळ उत्पादक सोसायटीची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालिका सुहासिनीदेवी घाटगे होत्या. यावेळी ज्येष्ठ संचालिका सुहासिनीदेवी घाटगे यांनी संस्थेच्या स्थापनेतील दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या योगदानाची माहिती सभासदांना दिली. तसेच २०२१-२२ मध्ये संस्थेला १ लाख १२ हजार ७०८ रुपये निव्वळ नफा झाल्याचे सांगून संस्था दिवाळीपूर्वी पाच टक्के लाभांश देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सचिव दगडू माळी यांनी अहवाल वाचनात ३१ मार्च, २०२२ अखेर संस्थेचे अधिकृत भागभांडवल १७ लाख रु., वसूल भागभांडवल १५ लाख ८२ हजार रु., रिझर्व्ह आणि इतर फंड १७ लाख ३३३ रु. असल्याचे सांगितले.