घुणकीत संविधान दिन साजरा !

घुणकी प्रतिनिधी : सचिन कांबळे
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपल्या देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान प्रत राज्यघटना म्हणून स्वीकारण्यात आली. तोच आज संविधान दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून गावातील एक बहुजन चळवळ गणली जाणारी युवा क्रांती आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या पुढाकाराने संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतीचे वाचन आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करण्यात आले..यावेळी युवा क्रांतीचे आनंदराव पाटील, संजय बुड्डे, रमेश पाटोळे, जयसिंग कुरणे, अशोक जाधव, राजवर्धन बुड्डे, आणि इतर संस्थेचे पदाधिकारी इत्यादी उपस्थितीत होते.
संविधान दिन विशेष…..
देशात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्वी राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जात होता. मात्र, २०१५ मध्ये सरकारने राष्ट्रीय कायदा दिवस बदलून संविधान दिन केला. खरं तर, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने औपचारिकपणे भारतीय राज्यघटना स्वीकारली. यानंतर २६ नोव्हेंबर १९५० रोजी राज्यघटना लागू झाली, हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.