बेलवळे बुद्रुक अपघातातील मृत होमगार्डच्या कुटुंबीयांना दोन लाखाचा विमा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बेलवळे बुद्रुक ता कागल येथील होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले श्री चंद्रकांत आप्पासो पाटील वय ४१ यांचे एक महिन्यापूर्वी मयत झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेअंतर्गत जीवन ज्योती विम्यातून दोन लाख रुपयांचा भरपाई रक्कम मंजूर झाली. त्यांच्या पत्नी श्रीमती संध्या चंद्रकांत पाटील यांना दोन लाख रुपयांचा धनादेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक निघून गेल्यामुळे कुटुंबाला संकटांचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबांच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने बेलवळे बुद्रुकचे माजी सरपंच नारायण पाटील, दौलतवाडीचे सरपंच विठ्ठल जाधव, मयूर आवळेकर, कागल तालुका खरेदी – विक्री संघाचे संचालक प्रकाश पाटील, बच्चन कांबळे, सागर भुरले, अमर सनगर, आदिप्रमुख उपस्थित होते.