ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऊसदर आंदोलनामध्ये सन्मानजनक तोडगा काढल्याबद्दल शेतकरी संघटनेच्यावतीने सत्कार

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ आंदोलनामध्ये सन्मानजनक तोडगा काढून गळीत हंगाम सुरळीत सुरू केल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार झाला.

नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, कालच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीवरून आंदोलनातील सन्मानजनक तोडग्याबद्दल धन्यवाद मानले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे सन्मानजनक तोडगा काढून हंगाम सुरळीत सुरू झाला.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले, ऊसदर आंदोलनामध्ये शेतकर्यांच्या भावना, शेतकरी संघटनेची भूमिका आणि साखर कारखाने यांच्यामध्ये पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी समन्वयाने चर्चा घडवून आणली आणि चांगला तोडगा काढला.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, अविनाश मगदूम, कसबा सांगाव ग्रामपंचायत सदस्य दिपक हेगडे, संतोष मगदूम, कुमार पाटील, अनिल माने, निलेश चौगुले आदी प्रमूख उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks