मुरगूड विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.67 टक्के ; सुरभी शहा मुरगूड केंद्रात दुसरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित,मुरगूड विद्यालय (ज्युनिअर कॉलेज) मुरगुड मधील सुरभी स्वप्निल शहा हिने 97 टक्के गुण मिळवून मुरगूड केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला.आर्या अनिल पाटील हिने टेक्निकल विषयात100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.मुरगुड विद्यालयाचा एकूण निकाल 97.67 टक्के लागला आहे.
शाळेचे गुणवंत विद्यार्थी असे सुरभी स्वप्निल शहा 97.00 ,आर्या अनिल पाटील 96.00 ,आदिती अनिल पाटील 95.20 ,मनस्वी बाजीराव चौगुले 94. 80, वैष्णवी विलास मेंगाने 94. 60 ,श्रावणी संजय मेटकर 94. 20 ,वीरेंद्र जयेंद्र कोंडेकर 93.80,आर्या अरुण सुतार 93.00,युगांक सुनील पाटील 92.80 ,पूर्वा दीपक कांबळे 92.60,आर्यन उत्तम शिंदे 92.40 ,अस्मिता रघुनाथ पावले 91.80,अंतरा विजय बेलवळेकर 91.40,साक्षी संदीप कापडे 91.20, श्रुती सर्जेराव भराडे 90.60, मथुरा संतोष परीट 90.20 गुण प्राप्त केले आहेत.
90 टक्के च्या वरती 16 तर 80 टक्के च्या वरती 59 विद्यार्थी 70 टक्के च्या वरती 66 विद्यार्थी
या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्ष शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य एम.डी. खटांगळे, पर्यवेक्षक एस.डी.साठे,पी.बी.लोकरे यांचे प्रोत्साहन लाभले तर सर्व शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.