ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड : स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाला यश आलेबद्दल मुरगुडमध्ये रॅली काढून आनंदोत्सव

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
स्वाभिमानी संघटनेने कोल्हापूर, शिरोली येथे केलेल्या आंदोलनाला यश आले म्हणून या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी मुरगूडमध्ये आल्यानंतर फटाके उडवून साखर वाटून संपूर्ण शहरात रॅली काढली. या आनंदोत्सवात मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते. शहरात संघटनेच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी संदीप भारमल, समाधान हेंदळकर, गजानन साळोखे, दतात्रय मंडलिक, गजानन मोरबाळे, अमित साळोखे, बबन बाबर, युवा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कमळकर, मयूर सावर्डेकर, राणोजी गोधडे, सचिन मेंडके, राजेंद्र भारमल, रघुनाथ चौगले, शशिकांत चौगले, सर्जेराव भाट, पृथ्वीराज बाबर उपस्थित होते.