ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पन्हाळा : पुनाळ येथे फिरते लोकअदालतीचे आयोजन व कायदेविषयक शिबिर.

कळे-वार्ताहर अनिल सुतार

तालुका विधी सेवा समिती कळे-खेरिवडे मार्फत दिनांक 22 रोजी पुनाळ ता. पन्हाळा येथे फिरत्या लोक अदालतीचे आयोजन व कायदेशीर सल्ला व माहिती शिबिर आयोजित करण्यात आले होते .

सदर शिबिरामध्ये श्रीमती व्ही.ए. लावंड-कोकाटे दिवाणी न्यायाधीश क.स्तर कळे खेरीवडे यांनी उपस्थितांना मृत्यू पत्राची माहिती व विधी सेवा समितीची कार्ये याविषयी माहिती दिली. त्यामध्ये ॲड तुषार. एस .पाटील यांनी पालकांचे हक्क व अधिकार, ॲड मालविका पी गोटखिंडीकर जेष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार , ॲड प्रशांत एच पाटील राष्ट्रीय विधी सेवा योजना, ॲड उदयसिंह डी जगताप सरकारी अभियोक्ता- सामान्य नागरिकांचे कायदेविषयक कर्तव्य व जबाबदाऱ्या, तानाजी बी पाटील ग्रामसेवक पुनाळ -शासनाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन याप्रमाणे सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.

यावेळी कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील व पुनाळ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,सदस्य तसेच गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिवाणी न्यायालय क स्तर कळे-खेरीवडे कडील सहाय्यक अधीक्षक आर डी सोनुले, यू.एन खटावकर, एस.एस साळोखे, ए.व्ही कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले.कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन ॲड जालंधर एम.आंगठेकर यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks