ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगलीतील हिसडा गँगचा चोरटा निघाला राधानगरीचा ! चोरीचे सोने विक्रीसाठी आल्यावर पोलीसांच्या जाळ्यात

राधानगरी – सांगलीत काही दिवसपासून सलग हिसडा मारून सोन्याचे दागिने पळविणाऱ्या आणि महिला वर्गात दहशत निर्माण केलेल्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली. उत्तम राजाराम बारड हा अवघ्या तिशीतील चोरटा धामोड, ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्याच्याकडून साडेसहा तोळे सोन्यासह एक दुचाकी असा साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सांगलीतील शंभरफुटीसह मौजे डिग्रज, इचलकरंजी, जैनापूर अशा सात ठिकाणच्या चोरीची त्याने कबुली दिली आहे.

चेन स्नेचिंग करणाऱ्या टोळीत स्थानिक किती आणि बाहेरगावहून आलेले गुन्हेगार किती आहेत याची माहिती काढण्याची जबाबदारी आता सांगली शहर पोलिसांवर आली असून या पोलीस ठाण्याकडे त्याला वर्ग करण्यात आले आहे. हिसडा टोळीला पकडण्यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील पथक निर्माण केले आहे.

जेथे जेथे हे गुन्हे घडले तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. त्यातच हवालदार सागर लवटे आणि नाईक सागर टिंगरे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार बारड हा कुपवाड रोडवर सूतगिरणी चौकात चोरीचे दागिने विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. सूतगिरणी चौक परिसरात या पथकाने सापळा रचला त्यात उत्तम बारड अडकला. पँटच्या खिशात चोरीचे दागिने मिळाले.

शिवाय मोटार सायकलही चोरीची असावी अशा पध्दतीने त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला अटक करून त्याचा ताबा सांगली शहर पोलीस ठाण्याकडे देण्यात आला आहे. त्याच्याकडून एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सांगली, डिग्रज, इचलकरंजी, जैनापूर सात ठिकाणी चोरी

अधिक चौकशीत त्याने ही मोटारसायकल 100 फुटी रोड, खिलारे मंगल कार्यालय, या ठिकाणी चोरी करताना वापरली आहे. त्याच्या खिशात असलेले दागिने हे 100 फुटी रोड, खिलारे मंगल कार्यालय, मौजे डिग्रज गावाचे रोड, सांगली आणि कोल्हापूर येथील इचलकरंजी व जैनापूर ता. शिरोळ येथे सकाळी चालायला येणारे महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी केलेले दागिने असल्याची कबूली दिली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks