आदर्श कागल घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा : समरजितसिंह घाटगे ; राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
स्व.विक्रमसिंहराजे यांच्या स्वप्नातील शाहूंचे आदर्श कागल घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा.असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्यावतीने सन २०२३या वर्षातील स्व. राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.यावेळी जीवन गौरव ३, आदर्श मुख्याध्यापक१३, प्राथमिक३७, माध्यमिक२८ शिक्षकेत्तर३ अशा ८४ जणांना या पुरस्काराने सन्मानित केले.
यावेळी नामदेव चौगुले यांनी राजे फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी अकरा हजार रुपये देणगी समरजितसिंह घाटगे यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी अवयव दानावर आधारित नजरिया हा विविध पुरस्कार प्राप्त लघु चित्रपट दाखविला. शिक्षकांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला.
ते पुढे म्हणाले, शिक्षकांच्यात केवळ विद्यार्थीच नव्हे तर समाज घडवण्याची ताकद आहे. शिक्षकांच्या मेहनतीमुळेच कागल तालुका शैक्षणिकदृष्ट्या जिल्ह्यात अव्वल आला आहे. तो आता राज्यात अव्वल आणूया. त्यासाठी शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे.
यावेळी रोहिणी लोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे सर्व संचालक शिक्षक नेते दादासाहेब लाड राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील,राजेंद्र तारळे,जनार्दन निऊंगरे,राजाराम सावर्डेकर, दत्तात्रय पाटील, विष्णू पाटील, राजेंद्र पोवार,आदींची प्रमुख उपस्थिती होती.स्वागत तानाजी तारदाळे यांनी केले.आभार एल.डी.पाटील यांनी मानले.
…..तर स्व.राजे मुख्यमंत्री झाले असते
शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्व. विक्रमसिंहराजे यांनी सर्वच क्षेत्रात आदर्शवत काम केले. सुरुवातीच्या काळात दोन वेळा आमदार झालेल्या राजेंना तिसऱ्या वेळी कागलमधील कुटिल राजकारणामुळे पराभवास सामोरे जावे लागले.त्यावेळी जर ते तिसऱ्यांदा आमदार झाले असते तर राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले असते. या कुटिल राजकारणामुळे स्व. राजे साहेबांच्या व्यक्तिगत नुकसानीपेक्षा केवळ कागल तालुक्याचे नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही कसर समरजीतसिंहराजेंच्या आमदारकीच्या रूपाने भरून काढूया. असे आवाहन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत बोभाटे यांनी केले.