“मी हिंदू धर्म रक्षक” या अभियानात तरुण तरुणीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : बंडा साळुंखे

श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परम पूज्य प्राणिलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शना खाली मी हिंदू धर्म रक्षक अभियानाची सुरुवात पडलीहाळ येथून करण्यात आली. सर्वप्रथम पडलिहाळ मधील तरुण व तरुणीने मिरवणूक काढून प्रमुख पावन्यान्चे स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत राष्ट्रभक्तीपर गीते जयघोष सोबत ठीक ठिकाणी रांगोळी व पाणी घालून स्वागत करण्यात आले.
यानंतर पडलीहाळ येथील श्री मारुती मंदिर मध्ये श्री हनुमान चालीसा व पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी मातृशक्तीच्या इचरकंजी येथील प्रमुख सौ.रेवती ताई हानमसागर यांनी मार्गदर्शन करते वेळी म्हणाले की महिलांना हिंदू धर्मा प्रथम स्थान दिले जाते आजची स्त्री ही दुर्गा देवीचे रूप आहे. ती कुठल्याही प्रकारे अन्याय,अत्याचार सहन करणार नाही.
आपल्या देशाचे व संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे जगामध्ये अनेक योध्दे होऊन गेलेत पण आपल्या भारत देशामध्ये घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन शत्रूची माती करणाऱ्या वीर माता, विरांगणा फक्त आणि फक्त याच मायभूमीत झाले आहेत याचा आदर्श घेऊनच आजच्या स्त्रियांनी देव देश धर्मकार्यात पुढे यायला हवे सोबत लाठी, काटी तलवार बाजी चे प्रशिक्षण ही घ्यायला हावे. निपाणी पाणी परिसरामध्ये राष्ट्रकार्यात महिलांचे योगदान मोलाचे आहे असे मत यावेळी व्यक्त केले.
कोल्हापूर येथील हिंदू नेता बंडा उर्फ संभाजी साळुंखे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करते वेळी बंडा साळुंखे म्हणाले की निपाणी परिसरात श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू.प्राणलिंग महास्वामीजी याच्या मार्गदर्शनाखाली मी हिंदू धर्म रक्षक हे अभियान सुरू केलेले आहे या अभियानाची आवश्यकता कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यालाही आहे या अभियाना मध्ये परिसरातील हिंदू तरुण-तरुणीने तन-मन-धनाच्या माध्यमातून सहभागी व्हावे असे आव्हान बंडा सोळंके यांनी केले.
यावेळी बंडा सोळंके म्हणाले की आज देशामध्ये ऐक दिवस असं जात नाही की खून,बलात्कार, अन्याय,अत्याचार घडत नाही असं दिवस नाही हे आपल्या साठी दुर्देवी आहे आपल्या क्रांतिकारक यांनी यासाठीच आपला देश स्वतंत्र केला होता का ? हे थांबवण्यासाठी आताच्या तरुण तरुणींनी राष्ट्र कार्यात स्वतःला झोकून द्यायला हावे आज पाहा तिकडे अन्याय, अत्याचार, धर्मावर आघात, देवी देवतांचे विटंबन, लव्ह जिहाद, लँड जिहाद गोहत्या हे थांबवण्या साठीच मी हिंदू धर्म रक्षक अभियान निपाणी परिसरातून चालू केलेला आहे.
यामध्ये आपल्याला काहीही मदत पाहिजे असेल तर कोल्हापूर मधील सर्व हिंदुत्ववादी संघटना या अभियानात आपल्या पाठीशी राहू असे मत व्यक्त केले. प. पू. प्राणलिंग स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत गडकोट मोहीम, निरोगी आरोग्य यावर मार्गदर्शन करून युवकांनां निर्वेसनी बनवण्याचे अनमोल कार्य केले आहे निपाणी परिसरावर जेव्हा जेव्हा संकट येईल त्या त्या वेळी स्वामीजींनी राष्ट्रा साठी कार्य करण्याऱ्या तरुणांना सोबत घेऊन त्या संकटांचा सामना करण्यासाठी आघाडीवर असतात आजापासूनच राष्ट्रकार्यात स्वतःला झोपून द्या असे आवाहन जमलेल्या तरुण तरुणींना बंडा साळोखे यांनी यावेळी केले.
श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू.प्राणीलिंग स्वामीजी हे मार्गदर्शन करते म्हणाले की आजचा तरुणहा हा विज्ञानाच्या सोबत खूपच मोठी प्रगती करत आहे पण त्यासोबत आपल्या राष्ट्राची ही प्रगती करावे. असे विचार आजच्या तरुणांनी ठेवावेत जो देश आपल्या पूर्वजांच्या इतिहास वाचत नाही तो विश्वाच्या संघर्षात टिकत नाही.यासाठी तरुणांनी आपल्या महापुरुषचा क्रांतिकारक यांचा आचार विचार आचरणात आणावे.आणि निपाणी परिसरातसर्व तरुण-तरुणींनी एकत्रित येऊन वाईट गोष्टींचा नाश कारणासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. असे मत यावेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर श्रीखंडे यांनी केले तर सुचिता ताई कुलकर्णी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी अँड. गणेश गोंधळी,सुमित सासणे, सौ.अरुणाताई माने, आर्या भंडारी, हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाला पडलिहाळ गावांमधील तरुण-तरुणी संख्येने उपस्थित होत्या.