करंजगांव ग्रामस्थांची दिशाभुल ; ग्रामपंचायत प्रशासनाचा ढोबळ, मनमानी कारभार पुनश्च समोर

ग्रामपंचायत करंजगांव कडील मनमानी कारभाराबाबत वारंवार तक्रारी व पुरावे सादर करुनही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ दि.१७/१०/२०२३ पासुन ग्रा.पं. कार्यालयासमोर सत्याग्रही धरणे आंदोलन सुरु होते. दि.२०/१०/२०२३ रोजी पंचायत समितीकडुन सुनावणीचे पत्र दिल्या कारणे आंदोलन तात्पुरते मागे घेतले होते.
संबंधित सुनावणीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडुन काही ग्रामस्थांची दिशाभुल करत सार्वजनिक सभामंडप व हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घेतलेल्या यादी व सह्यांचा गैरवापर करत पंचायत समिती चंदगड कडे सुनावणीबाबत तक्रार दिली आहे.
याबाबतची सखोल चौकशी होवुन दोषींवर कठोर कारवाई होणेबाबत चंदगड पोलिस ठाणेस आंदोलकांच्या वतीने तक्रार दिली आहे. संबंधित लोकांच्यापासुन आम्हां आंदोलकांच्या जिवीतास धोका असुन याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.
ग्रामपंचायत करंजगांव कडील तक्रारींच्या अनुषंगाने सत्यता बाहेर येवु नये याकरीता ग्रा.पं. प्रशासनाकडुन ग्रामस्थांची दिशाभुल करत केविलवाना प्रयत्न केला जात आहे.