चंदगड : म्हाळेवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती कोरोनाचा पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी

चंदगड प्रतिनिधी :
म्हाळेवाडी ता चंदगड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वि जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधे पणाने साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सी ए पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन रामू कांबळे यांनी केले. हा कार्यक्रम सरपंच सी ए पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मूलमंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा दिलेला नवीन पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जाती पुरतेच मर्यादित राहिले आहेत. पण त्याचे काम सर्व जगाला आदर्शवत असे आहे. स्वातंत्र्य, समता बंधुता हे आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिल्या भारतीय राज्यघटनेमधून मिळाले. यावेळी गावातील ग्रामस्थ युवा वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन प्रशांत कांबळे यांनी केले. आभार सुधीर कांबळे यांनी मानले.