लोकसेवा तरुण मंडळाच्या वतीने लक्षतीर्थ वसाहत मधील खेळाडू व समाजसेवकांचा ‘लोकसेवा गौरव ‘ पुरस्कार देऊन केला सन्मान

कोल्हापूर,शारदीय नवरात्रौत्सव 2023 या पावन पर्वात लोकसेवा तरुण मंडळाच्या वतीने आपल्या लक्षतीर्थ वसाहती मधील उदयोन्मुख खेळाडू व विविध क्षेत्रात निस्वार्थी पणाने काम करणाऱ्या नागरिकांना लोकसेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सालाबाद प्रमाणे या ही वर्षी खालील प्रमाणे स्पर्धा घेण्यात आल्या
स्तोत्र पठण
कराओके गीत गायन
संगीत खुर्ची
फणी गेम्स या स्पर्धा घेण्यात आल्या.
1- प्रदीप खेडकर (लक्षतीर्थ तलाव परिसर संवर्धन )
2- महादेव पाटील -CPR येथे नडलेल्या लोकांना मदत व घरपोच औषध सेवा.
3 -राजू काळे -चंबुखडी येथे झाडें लावून ती जगवतात व तिथले गवत कापून गाईना खायला घालतात.
4 -ईशा कुंभार – नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा खेळत असलेली रायफल शुटर.
5 -आर्यन बेर्डे -भारत सरकार च्या राष्ट्रीय रोबोटीक स्पर्धेत देशात 3रा क्रमांक मिळविला.
6 -रोनित जांभळे – कुफा या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धे साठी निवड व उत्कृष्ट खेळी करून सर्वासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
7-श्रावणी चौगले – विविध लघुपट स्पर्धामध्ये उत्कृष्ट बालकलाकार म्हणून अवॉर्ड मिळाले आहेत.
या वरील सर्व पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे त्यांच्या पुढील वाटचालीस लोकसेवा तरुण मंडळ शुभेच्छा देत आहे व दरवर्षी अशा विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या लक्षतीर्थ वासियांचा गौरव करण्याचा प्रयत्न करत राहील.