ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बरगेवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कुडूत्री (प्रतिनिधी)
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज बरगेवाडी तालुका राधानगरी ग्रामपंचायत इथे साधेपणाने साजरी करण्यात आली.
एक थोर समाज सुधारक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. बाबासाहेबांनी प्रत्येक विषयावर सखोल अभ्यास केला आहे तसेच त्यांनी विविध चळवळी केल्या आहेत. कार्यक्रमात जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामसेवक सुरेश ढेरे यांनी केले यावेळी एम. एन. बरगे धनाजी बरगे डाटा ऑपरेटर सुमित जाधव कर्मचारी चंदर बरगे अंबाजी बरगे संदीप बरगे उपस्थित होते