शिंदेवाडी येथे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांना अभिवादन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिंदेवाडी (ता कागल )येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त सरपिराजीराव गूळ उत्पादक सोसायटी व श्रीराम सोसायटी येथे फोटोपूजन करून अभिवादन करण्यात आले .
बिद्री कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन दत्तामामा खराडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादन केले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्व. घाटगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची खबरदारी घेत हा स्मृतिदिन मोजक्या कार्यकर्त्यांनच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा केला.
यावेळी रामभाऊ खराडे ,शिवाजी शिंदे,अशोक खराडे,गुंडू पाटील,आबासो खराडे ,गजानन खराडे ,निवृत्ती सावंत,महादेव शिंदे,चंद्रकांत आंगज,उत्तम मोरबाळे, विनायक शिंदे,बाळासो मोरबाळे, शंकर पाटील ,संदीप शिंदे,संजय मगदूम,महिपती खराडे,ऋषिकेश सावंत,आदित्य खराडे उपस्थित होते.