पन्हाळा : बाजारभोगाव व परखंदळे येथे मटका अड्ड्यावर छापा ; चौघांवर कारवाई !

कळे वार्ताहर: अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव येथे श्रुतिका हॉटेलच्या पाठीमागे आडोशाला उघड्यावर लोकांकडून कल्याण मटका घेताना पांडुरंग उचाप्पा खोत वय 65 मोताईवाडी ता. पन्हाळा व शामराव लक्ष्मण पोवार रा .करंजफेन ता. शाहूवाडी यांच्यावर कारवाई करण्यात येऊन एकूण 10135 रुपयांची रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मारुती पाटील यांनी दिली असून पुढील तपास पो.हे.कॉ कुंभार करत आहेत.
तर दुसरीकडे परखंदळे ता. पन्हाळा येथे कोल्हापूर-गगनबावडा रोडला बापू कांबळे यांच्या पडक्या घराशेजारी उघड्यावर लोकांकडून मुंबई मटका जुगार घेताना रविंद्र रघुनाथ कुंभार वय 38 रा.पणुत्रे ता.पन्हाळा व अशोक रामचंद्र राबाडे रा.कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन एकूण 11920 रुपयांची रोख रक्कम व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबतची फिर्याद कळे पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल सागर पांडुरंग पाटील यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार एम एन खाडे करत आहेत.
कळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका व्यवसाय वाढला ?
गेल्या काही दिवसांपासून कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैद्य दारू विक्री व मटका व्यवसाय याचे प्रमाण वाढले असून जास्त पैसे मिळण्याच्या लालसेपोटी तरुण वर्ग व नागरिक या व्यवसायात दिवसेंदिवस गुरफडले जात असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका व्यवसाय वाढला असून अनेक नागरिक व तरुण वर्ग वाममार्गाला जात आहेत याविषयी परिसरातील अनेक जाणकारांतून चिंता व्यक्त होत असून कळे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी छुप्या पद्धतीने सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवरती वेळीच कारवाई करून संबंधितांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.