मुरगूडची कु .आत्मरूपा यशवंत हळदकर जवाहर नवोदय विद्यालयात ९१.६० % गुण मिळवून प्रथम

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूडची माजी विद्यार्थिनी आणि जवाहर नवोदय विद्यालय कागल येथे शिक्षण घेत असलेली आत्मरूपा यशवंत हळदकर हिने सी बी एस सी (CBSC) बारावी बोर्ड परीक्षेत विज्ञान विभागात ९१.६० % गुण मिळवत कागल जवाहर नवोदय विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे .
कु.आत्मरूपा ही ४थी स्कॉलशीप परीक्षेत केंद्रात २ री तर ५ वी नवोदय विद्यालयासाठी शिवराज मधून निवड झाली होती . त्यानंतर नवोदय विद्यालय कागल येथे तिने १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे शिक्षणा बरोबर खेळामध्येही तिने आपला ठसा उमटला असून राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय बॉस्केट बॉल खेळातून ती चमकली आहे.
हिचे वडील श्री यशवंत मारुती हळदकर हे सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना हमिदवाडा येथे वाहतूक विभागात चालक म्हणून सेवेत असून, शेतकरी कुटुंबातील श्री. हळदकर हे मोठ्या जिद्दिने आपल्या मुलीला शिकवित आहेत
कुमारी आत्मरूपा हिने. मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल तिचे व तिच्या कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
तिला प्राचार्य के श्रीनिवास राव, उपप्राचार्य अन्सी जॉर्ज व नवोदय विद्यालयाच्या सर्व शिक्षक स्टाफचे मार्गदर्शन तर खा . संजय मंडलिक ॲड विरेंद्र मंडलिक व तिचे वडील यशवंत हळदकर यांचे प्रोत्साहन मिळाले.