ताज्या बातम्यामहाराष्ट्र
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राजेसमरजितसिंह घाटगे यांचे अभिवादन

कागल,प्रतिनिधी .
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कागल शहरातील मध्यवर्ती असलेल्या गैबी चौकातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज, शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी अभिवादन केले. यावेळी शाहू ग्रूपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी ,नगरसेवक,कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राजर्षि छत्रपती शाहू महाराज ,महात्मा फुले यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
तसेच प्रतिवर्षी प्रमाणे येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्याना अभिवादन केले.
यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.