ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकनेते कै. खा. सदाशिवराव मंडलीक यांची ८९ वी जयंती मुरगूडमध्ये साजरी !

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांची ८९वी जयंती मुरगूडमध्ये शिवभक्त धोंडीराम परीट व नागरिकांच्या वतीने साजरी करण्यात आली .

लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन सौ . भारती धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर सर्वांनी स्व . मंडलिक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले .

या कार्यक्रमात शिवभक्त थोंडीराम परिट यांनी स्वागत केले .यावेळी बोलताना प्रा सुनिल डेळेकर म्हणाले , लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात गोरगरीबसामान्य जनता केंद्रबिंदू मानून कार्य केले . त्यांचे कार्य समाजाला आजही उपकारक आहे . त्यांचे विचार व कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

यावेळी भारती धर्माधिकारी , विकी साळोखे .सौं स्नेहल मोर्चे यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमास अरुधती साळोखे, मंगल गोरुले, शुभांगी गवाणकर, स्वरा शहा, कासुबाई चित्रकार, ‘ अनुराधा गवाणकर ‘ सदानंद मिरजकर , पत्रकार शशी दरेकर , नगरसेवक विशाल सुर्यवंशी ,पांडुरंग सुर्यवंशी , बसू मेस्त्री , आदि सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks