लसीकरणासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू

प्रतिनिधी :
1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. या लसीकरणासाठी बुधवार (दि.28) पासून नोंदणी सुरू केली जाणार आहे. नोंदणी केल्याखेरीज कोणालाही लस दिली जाणार नाही. केंद्रांवर जाऊन नोंदणी करता येणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची गती वाढविण्यात येत आहे. केंद्र शासनाने 18 वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 मेपासून हे लसीकरण सुरू होईल. त्याची नोंदणी तीन दिवस आधी सुरू केली जाणार आहे. जी वेळ असेल, त्याच वेळी लस मिळणार
नोंदणी झाल्यानंतर संबंधिताला लस घेण्यासाठी जी तारीख व वेळ (सत्र) मिळाले आहे, त्याचा मेसेज येईल. त्यानुसार जी तारीख असेल त्याच दिवशी त्याच ठिकाणी त्याला लस घेता येणार आहे. नोंदणी करताना जी Appointment बुक केली होती, ती बदलण्याचीही सुविधा या पोर्टलवर आहे. मात्र, Appointment घेतलेल्या वेळीच लस दिली जाणार आहे.
# अशी करावी नोंदणी
* लस घेणार्यांना www.cowin.gov.in या साईटवर नोंदणी करावी लागणार आहे. Google वर जाऊन cowin.gov.in टाईप करा. Register/ Sign in yourself मध्ये लस घेणार्यांचा मोबाईल नंबर टाईप करा. यानंतर OTP जनरेटवर क्लिक करा.
* नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो OTP मध्ये टाका व क्लिक करा. यानंतर Vaccine Registraction form भरा. क्लिक करा. vaccine साठीregistraction केल्यानंतर मोबाईलवर मेसेज येईल.
* नोंदणी झाल्यानंतर schedule appointment वर क्लिक करा. नंतर तुमचा पिन कोड टाका. नंतर Sessation निवडा- Vaccin center व Date निवडा. Appointment book करून ती coform करा.