ताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथील पुतळ्याला पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोल्हापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा जगातील एकमेव असा पुतळा आहे, जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये उभारण्यात आला असून दस्तुरखुद्द बाबासाहेबांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना याठिकाणी भेट दिली होती .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य आणि विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ही भावना ठेवून थोर समाजसुधारक भाई माधवराव बागल यांनी 9 डिसेंबर 1950 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांचे ब्रॉन्झमधील दोन पुतळे बिंदू चौक येथे उभे केले.
यावेळी, पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील,आमदार ऋतुराज पाटील,आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. शरद गायकवाड, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, सदानंद दिघे, डी.जी.भास्कर ,प्राचार्य विश्वास देशमुख, रूपालीताई वायदंडे, संजय जिरंगे, बाळासो भोसले, जयसिंग जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत, गोकूळचे माजी संचालक बाबासो चौगले, खंडेराव जगदाळे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks