कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा !

कोल्हापूर (सचिन कांबळे):
येथे वंचित बहुजन युवा आघाडी मार्फत आज दिनांक ०५/१०/२०२३ रोजी भव्य अशी रॅली काढून शासनाच्या अनेक निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मोर्चा चे नेतृत्व आणि नियोजन जिल्ह्याचे युवा अध्यक्ष प्रा मिलिंद सनदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या मोर्चाला प्रामुख्याने सुरुवात पेठ वडगाव येथून ते सांगली फाटा मार्गे दसरा चौक कोल्हापूर येथे आल्यानंतर येथून एकत्रित येऊन शिस्तबद्द पद्धतीने मार्गक्रमण करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्व तरुणांनी कोल्हापूर शहर परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने तरुण वर्ग दिसून येत होता. या मोर्चातील प्रमुख्य मागण्या शाळांचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे,राज्यातील शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण करून कंत्राटी नोकरभरती होणारा अध्यादेश रद्द करण्यात यावा, सर्वच स्पर्धा परीक्षाची फी सर सकट १०० रुपये करण्यात यावी, बार्टी, महाज्योती, सारथी व परदेशात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना मिळणारी फेलोशिप वेळेत मिळावी, पेठ वडगाव प्रस्तावित शहर विकास आराखडा हा चुकीच्या पद्धतीने करणेत आला आहे. तो आराखडा तत्काळ रद्द करण्यात यावा या आणि अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे, जिल्हा युवा अध्यक्ष मिलिंद सनदी यांनी उप जिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना वंचित आघाडीच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आले.
यावेळी वंचित आघाडीच्या महिला अध्यक्ष वासंती म्हेतर, कामगार आघाडी संजय गुदगे, युवा प्रदेश सदस्य अफरोज भाई मुल्ला, युवा जिल्हा महासचिव डॉ आकाश कांबळे, जिल्हा महासचिव दीपक कांबळे, कृष्णात कांबळे, युवा जिल्हा उप अध्यक्ष दत्तात्रय कांबळे, मछिंद्र कांबळे, वर्षा कांबळे दशरथ दीक्षांत, प्रवीण बनसोडे, मनीष कांबळे, सचिन माळी, कुणाल भडगावकर, रवी कांबळे, भीमराव तांबे, सतीश कांबळे, शमशुद्दीन मोमीन, अनिकेत कांबळे, तसेच कोल्हापूर जिल्हयातील विविध तालुक्यातील शाखा प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा मोर्चा शांततेत पार पाडण्याकरिता चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या करीत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अजय सिंदकर, पोलीस उपनिरीक्षक परीट, पोलीस नाईक अतिग्रे, हेड कॉन्स्टेबल मुजावर, पोलीस नाईक कोरवी, पोलीस नाईक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नाईक आदी पोलीस प्रशासन उपस्थित होते. यावेळी यांचेदेखील वंचित युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी यांनी आभार मानले.