ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
…भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मंगळवारी कोल्हापूर दौर्यावर; पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता.

कोल्हापूर :
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गैरव्यवहारप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी मंगळवारी (दि. 28) कोल्हापूरला येत आहे, असे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना बुधवारी पत्राद्वारे कळविले आहे.
सोमय्या यांचा दौरा
- सोमवारी, 27 सप्टेंबरला रात्री आठ वाजता मुंबईहून कोल्हापूरकडे रेल्वेने रवाना
- मंगळवारी, 28 सप्टेंबरला सकाळी साडेसात वाजता कोल्हापूर रेल्वेस्टेशनवर आगमन
- सकाळी 9 वा. अंबाबाईचे दर्शन
- दुपारी स्थानिक (कागल/मुरगूड) पोलिस ठाण्यात मंत्री मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार