करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेता येणार : पालकमंत्री दीपक केसरकर

साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेता येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. डोके ठेऊन नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत होते. कोरोनामुळे बंद असलेले अंबाबाईचे गाभारा दर्शन उद्यापासून 29 ऑगस्ट सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पुन्हा एकदा मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. मात्र अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे. मात्र भाविकांना देवीच्या पायावर डोके ठेऊन दर्शन घेण्याची आस लागून होती.